बाबा आमटे
बाबा आमटे
“माणुसकीचा महामेरू — आनंदवनातून फुललेली मानवतेची चळवळ”
बाबांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यापैकी महत्त्वाचे काही खालीलप्रमाणे—
१) १९८३ मध्ये ‘डेमियन डट्टन पुरस्कार’ — कुष्ठरोग्यांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा हा आंतरराष्ट्रीय अमेरिकन पुरस्कार आहे.
२) १९८५ मध्ये कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन सुरू केल्याबद्दल ‘रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ मिळाला. हा आशियातील नोबेल पुरस्कार समजला जातो.
३) १९८६ साली भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मविभूषण’ देऊन भारत सरकारने बाबांना गौरविले. हा पुरस्कार त्यांना सामाजिक कार्य, मानवसेवा व राष्ट्रासाठी केलेल्या योगदानासाठी मिळाला.
४) १९८८ मध्ये ‘संयुक्त राष्ट्र मानवाधिकार पुरस्कार’ प्राप्त झाला. हा पुरस्कार दर पाच वर्षांनी दिला जातो. मानवाधिकार संरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी अविरत कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार बाबांना दिला गेला.
५) १९९९ मध्ये भारत सरकारचा सर्वोच्च शांतता पुरस्कार ‘गांधी शांतता पुरस्कार’ देऊन बाबांचा सन्मान करण्यात आला.
६) १९९९ मध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
७) ‘जमनालाल बजाज पुरस्कार’
८) महाराष्ट्र सरकार व विविध स्वयंसेवी संस्थांकडून ‘आयुष्य गौरव पुरस्कार’
९) अनेक विद्यापीठांकडून बाबांना ‘मानद डॉक्टरेट’ ही पदवी प्रदान करण्यात आली.
१०) १९९१ मध्ये पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रांचा ‘डेल ऑफ ऑनर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
११) १९९१ मध्ये नर्मदा बचाव आंदोलनासाठी मेधा पाटकर यांच्याबरोबर संयुक्तपणे ‘राईट लाईव्हलीहुड अवॉर्ड’ (स्वीडन) प्रदान करण्यात आला.
१२) २००४ मध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार
१३) १९९८ मध्ये महाराष्ट्र सरकारचा ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार